सृष्टीवर ज्ञान, विद्या आणि चरित्र हे नकल करून मिळत नाही, ते अर्जित करावं लागतं. साम्राज्य निर्माण होतात, नष्ट होतात. निर्माण होणं, नष्ट होणं हा सृष्टीचा नियम आहे. मात्र, साधना करून अर्जित केलेले तत्त्वज्ञान हे अमर असतं. साधना केल्याशिवाय जीवनात कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही.

कठोर साधना हीच कोणत्याही क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली असते. ज्या पद्धतीची साधना आपण करू त्या क्षेत्रातील उंची आपण नक्कीच गाठू शकतो. पण ही उंची आपल्याला नकल करून गठन शक्य होणार नाही. वरकरणी जरी आपण उंची गाठल्याचा भास आपल्याला होत असला, तरी तो वास्तविक भ्रम असतो. असत्याच्या रथावर स्वार होऊन वेगाने प्रवास करता येईलही, पण तो मर्यादित अंतरावरचा असत्याचा रथ फार काळ मैदानावर टिकत नाही. दीर्घकालीन प्रवासासाठी मात्र मती आणि गती ही सत्याची अभिव्यक्ती असणं गरजेचं आहे. तेव्हाच अनियंत्रित प्रवास यशस्वी होतो. सत्य समजणं एवढं सहज सोपं नसतं आणि त्यापेक्षाही सत्य समजून आचरण करणं हे त्यापेक्षाही कठीण असतं. मुळात सत्य ही तपस्या कठीण आहे, पण अवघड नाही. विद्यमान युगात सत्याची अभिव्यक्ती होण्याची मानसिकता फार कमी लोकांची आहे आणि म्हणून अर्जित करण्याऐवजी नकल करण्यावर सध्या जास्त लोकांचा भर आहे. क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रात आपण आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व हे अर्जित करणं कधीही उत्तम ठरतं. निसर्गाने प्रत्येकाला समान दिलेलं आहे. पण कोणाची प्रतिभा कधी प्रकट होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. प्रतिभा ही शिक्षण, उच्च शिक्षण, पदवी यामधून निर्माण होत नाही. आपला अनुभव, आपला संयम, प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा भाव, दृष्टिकोन, परिपक्वता, वैचारिक प्रगल्भता, वेळेचं भान आणि मीपणाचा लवलेश नष्ट होणं. मी कोणीही नाही. शून्य आहे हा भाव जागृत झाल्याशिवाय प्रतिभा निर्माण होत नाही आणि नवीन ज्ञानाचा किरण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ज्ञान हे अमर्याद आहे आणि भविष्यातील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, दिनदर्शिका ठरेल असं प्रभावी ज्ञान हे नकल करून नाही तर साधना करून अर्जित करून निर्माण होतं. आणि ते आपोआप सुसाट वेगाने लोकांपर्यंत पोहोचतं. म्हणून चरित्र, ज्ञान, विद्या ही साधना करून अर्जित केली तर अमर होते. अन्यथा प्रचार आणि प्रसिद्धीचा जेवढा काळ आहे, त्या काळापुरती मर्यादित राहते. म्हणून जे अमर्याद काळासाठी आहे ते साधनेतून निर्माण होतं. आपला विश्वास आपल्या साधनेवर असला पाहिजे आणि आपली साधना योग्य दिशेने असली की,त्यामधून निर्माण होणारं तत्त्वज्ञान हे आपोआप लोककल्याणकारी ठरतं.

        –    गणेश खाडेे

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

22 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 hours ago