नाशिक

भोंदू खरातला आठव्या गुन्ह्यात कोर्टाने नाकारली पोलीस कोठडी

नाशिक : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात याला दाखल असलेल्या आठव्या गुन्ह्यात एसआयटीने मागितलेली पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळून लावत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात प्रथमच एसआयटीची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे. न्यायालयाने खरातला 12 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अशोक खरात याला गेल्या 15 मार्च रोजी लैंगिक छळ, शोषण आणि इतर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध नाशिकमध्ये आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी सात गुन्ह्यांमध्ये त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र आठव्या गुन्ह्यात न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारल्याने तपास यंत्रणेला धक्का बसला आहे.या प्रकरणात यापूर्वी ‘ओशोनो जल’, ‘चिंचोके’ आणि ‘रिंग मेजरमेंट’ अशा बाबींची चर्चा झाली होती. आता तपासात ‘काळा दगड’ समोर आल्याने गूढ अधिक वाढले आहे. गुरुवारी (दि. 30) एसआयटीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले. यावेळी तपास यंत्रणेने संबंधित काळा दगडही न्यायालयात सादर करत पोलीस कोठडीची मागणी केली.सुनावणीदरम्यान तपास अधिकार्‍यांनी न्यायालयाला तपासाची माहिती दिली. सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना, काळ्या दगडाचे गूढ अद्याप उलगडले नसल्याचे सांगितले. इतर गुन्ह्यांमध्ये हा दगड आढळला नव्हता, तो प्रथमच या प्रकरणात सापडल्याचा दावा करण्यात आला. आरोपीने तो कोणत्या कारणासाठी ठेवला होता, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले. तसेच पीडित कुटुंबाची आर्थिक फसवणूक झाल्याचाही संशय व्यक्त करत आरोपीची प्रत्यक्ष चौकशी गरजेची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, खरातच्या वकिलांनी तपास यंत्रणेच्या मागणीला जोरदार विरोध केला. ‘या काळ्या दगडाचा नेमका कोणता तपास करायचा आहे?’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा दावा केला. सीसीटीव्ही फुटेज आणि आधीच्या तपासाचा दाखला देत आरोपीच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. आर्थिक व्यवहारांबाबतचा संशय इतर गुन्ह्यांमध्ये नमूद नव्हता, तो आता कसा पुढे आला, असा प्रश्नही बचाव पक्षाने उपस्थित केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एसआयटीची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली.

Court rejects police custody of fraudster Kharat in eighth case

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago