10 उमेदवारांचे अर्ज दाखल; राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडीत समेट
मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागा आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीच्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. अखेर 10 जागांसाठी 10च उमेदवारी अर्ज रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे होणारा संभाव्य घोडेबाजार टळला असून, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार सुरक्षित करण्यात यश मिळवले आहे.
कुठल्याही पक्षाने अकरावा उमेदवार न दिल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी, त्यांना 10 आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जातील. भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 आणि मविआकडून 1 उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे. महाविकास आघाडीतील तणाव: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवृत्त होत असताना स्वतःऐवजी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. काँग्रेसनेही आपला उमेदवार देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आज गांधी भवन येथे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. दीर्घ चर्चेनंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राखण्यासाठी काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतला.
बच्चू कडूंचा शिवसेना प्रवेश : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिवसेना (शिंदे गट) पक्षात विलीन करून शिवसेनेची उमेदवारी मिळवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
प्रज्ञा सातव यांचा पक्षबदल : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना भाजपने त्याच पोटनिवडणुकीच्या जागेवर उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.
भाजपची नवी रणनीती: भाजपने यावेळी प्रस्थापित चेहर्यांऐवजी सुनील कर्जतकर आणि विवेक कोल्हे यांच्यासारख्या संघटनात्मक कार्यकर्त्यांना संधी देऊन सर्वांना धक्का दिला.
निवडून येणारे 10 उमेदवार
♠ भारतीय जनता पक्ष
1) सुनील कर्जतकर
2) प्रमोद जठार
3) माधवी नाईक
4) संजय भेंडे
5) विवेक कोल्हे
♠ पोटनिवडणूक
6) प्रज्ञा सातव
♠ शिवसेना (शिंदे गट)
7) नीलम गोर्हे
8) बच्चू कडू
♠ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
9) झिशान सिद्दिकी
♠ महाविकास आघाडी_
10) अंबादास दानवे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Legislative Council elections unopposed!
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…