12 ते 14 वयोगटातील 1.81 कोटींहून अधिक बालकांचे लसीकरण

नवी दिल्ली :- वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 1.81 (1,81,21,823) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लस मात्रा दिल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,445 असून, गेल्या 24 तासात 1,260 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.23% आहे. शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 184.52 (1,84,52,44,856) कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,20,93,346 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.23% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.24% आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *