नाशिक

गायीने गिळले तीन तोळ्यांचे मंगळसूत्र; शस्त्रक्रियेनंतर काढले सुरक्षित बाहेर

सिन्नर : प्रतिनिधी
घरच्या लक्ष्मीचे मंगळसूत्र चक्क गोठ्यातल्या ‘लक्ष्मी’ने गिळले आणि अखेरीस पशुवैद्यकांच्या शस्त्रक्रियेनंतर ते सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची आगळीवेगळी घटना सिन्नर तालुक्यातील दापूर येथे घडली. चोरांच्या भीतीपोटी घरच्या लक्ष्मीने गायींच्या खाद्याच्या गोणीत हे मंगळसूत्र सुरक्षित ठेवले होते. मात्र, तेच गायीच्या पोटात गेल्याने काही काळ कुटुंबीयांची धाकधूक वाढली होती.
दापूर येथील शेतकरी अर्जुन संतू हळकुंडे यांचा बुवाजी बाबा मंदिराशेजारी गायींचा गोठा आहे. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने त्यांच्या पत्नीने सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची पोत रात्रीच्या वेळी गायींच्या खाद्याच्या गोणीत ठेवली. मात्र, दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन हळकुंडे यांनी त्याच गोणीतून खाद्य काढून गायींना दिले. नकळत त्या खाद्यासोबत सोन्याची पोतही गायीच्या पोटात गेली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांची चिंता वाढली.
गायीच्या शेणातून पोत बाहेर येईल, अशी आशा त्यांनी धरली. मात्र, तीन-चार दिवस उलटूनही तसे न झाल्याने त्यांनी नांदूर शिंगोटे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय थोरात आणि डॉ. ऋषिकेश शेळके यांच्याशी संपर्क साधला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी गायीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुमारे एक तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे गायीचा जीवही वाचला आणि साडेचार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्रही शेतकर्‍यांच्या हाती परत आले.
पोत सुरक्षित मिळाल्याने हळकुंडे कुटुंबाच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य फुलले. गायीलाही जीवदान मिळाल्याने गावकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दापूर परिसरात ‘घरच्या लक्ष्मीचे मंगळसूत्र गोठ्यातल्या लक्ष्मीने गिळले’ ही घटना मात्र सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

Cow swallows three tola mangalsutra; safely removed after surgery

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago