नाशिक

आता स्कूल व्हॅनमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी सात नियमांचे कवच

चालक-मालकांचे चारित्र्य पडताळणी आता अनिवार्य

पंचवटी : प्रतिनिधी
बदलापूरमधील धक्कादायक घटनेने राज्य हादरले असतानाच, आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. शालेय वाहतुकीतील गंभीर त्रुटी दूर करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, आता प्रत्येक स्कूल व्हॅन चालकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासोबतच पिवळी नंबरप्लेट नसलेल्या गाड्यांवर थेट बंदी घालण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारद्वाज यांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
दिले आहेत.
शाळा आणि वाहनचालकांसाठी प्रशासनाने आता नवी नियमावली स्पष्ट केली आहे. त्यात शाळांना आता सर्व वाहनचालक, मालक यांचे नाव, मोबाइल क्रमांक आणि मार्गांची संपूर्ण माहिती ठेवणे सक्तीचे आहे. ही सर्व माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे शाळांसाठी बंधनकारक असेल. चालकाचा अनुभव, त्याचे वर्तन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही ना, याची पोलीस व्हेरिफिकेशनद्वारे खातरजमा करावीच लागेल. सर्व शालेय वाहने सार्वजनिक वाहतूक श्रेणीत नोंदणीकृत असावीत. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरटीओ नोंदणी रद्द केली जाईल. अनधिकृत किंवा नोंदणी नसलेल्या वाहनांतून विद्यार्थ्यांची ने-आण केल्यास संबंधित शाळा आणि वाहन मालकावर कठोर दंडात्मक कारवाई होईल. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनात प्रशिक्षित महिला परिचारिका किंवा मदतनीस असणे आता अनिवार्य आहे.

Now there are seven rules for the safety of children in school vans

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago