नाशिक

रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्यासाठी पीक स्पर्धा

नाशिक : प्रतिनिधी
पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकर्‍यांकडून विविध प्रयोगांच्या माध्यमातून उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकर्‍यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव करण्यात येतो. त्यासाठी रब्बी हंगाम पीक स्पर्धा 2025- 6 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
शासन निर्णयान्वये रब्बी हंगाम 2025 मध्येही पीक स्पर्धा मागील
वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2025 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


पीक स्पर्धेतील पिके
रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस (एकूण 5 पिके). पात्रता निकष ः स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्‍याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत भाग घेणार्‍या शेतकर्‍याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी
स्पर्धेत भाग घेता येईल. पीक स्पर्धेत सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रात सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12,8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकर्‍याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा जोडणे आवश्यक, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ः रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालीलप्रमाणे राहील.
ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस. दि. 31 डिसेंबर 2025 तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप
तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीवर पहिले बक्षीस रुपये पाच हजार, दुसरे बक्षीस रुपये तीन हजार व तिसरे बक्षीस रुपये दोन हजार असे आहे. जिल्हापातळीवर पहिले बक्षीस रुपये 10 हजार, दुसरे बक्षीस रुपये 7 हजार व तिसरे बक्षीस रुपये 5 हजार असे आहे. राज्यपातळीवर पहिले बक्षीस रुपये 50 हजार, दुसरे बक्षीस रुपये 40 हजार व तिसरे बक्षीस रुपये 30 हजार असे आहे. पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago