इस्त्रीसाठी कपडे घेऊन येणाऱ्या मुलावर दुकानदाराने केले असे काही की….

मनमाड: आमिन शेख

:- मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 64 वर्षीय बाबा भागवतला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला शिवाय त्याची शहरातील एका भागात असलेल्या लॉन्ड्रीच्या दुकानात प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले याप्रकरणी पुढिल तपास सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील एक 64 वर्षीय बाबा भागवत नावाच्या नराधमांने एका सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असुन या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे विशेष म्हणजे शहरातील एका भागात लॉन्ड्रीचे दुकानात कपडे इस्त्री करण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांसोबत तो लैंगिक चाळे करत असल्याचे समोर आले असुन याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन एट्रोसिटी व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा नराधम अनेक दिवसांपासून लहान मुलांना त्रास देत असल्याचे समोर आले असुन पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर करून त्याला पोलीस कस्टडीत घेतले आहे याबाबत सविस्तर तपास सुरू असुन आरोपींला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी सांगितले.

आरोपींला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न।

फिर्यादीच्या फिर्यादीवरून आम्ही तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एट्रोसिटी आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याशिवाय आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे याशिवाय फॉरेन्सिक टीमने याबाबत सगळे पुरावे गोळा केले असुन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असुन या भागात आम्ही गस्त वाढविली आहे याशिवाय कायदा सुव्यवस्था प्रश्न उद्भवू नये यासाठी देखील आम्ही संपूर्ण तयारी केली आहे शहरात असे कुठेही प्रकार घडत असतील तर नागरीकांनी सतर्क रहावे याशिवाय आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवावे .
बाजीराव महाजन, उपविभागीय पोलिस अधीक्षक

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago