पूर पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी

पोलिस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय

नाशिक : प्रतिनिधी
शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून काल दुपारी दहा हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले.
गंगापूरच्या विसर्गामुळे चार वाजेनंतर गोदावरीला पूर आला होता.पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.गर्दी पांगविण्यासाठी पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले.वाहतूक खोळबू नये यासाठी लाऊडस्पिकरवर सूचना देण्यात आल्या. व्हिक्टोरिया पुलावर सेल्ङ्गी घेणार्‍यांना समज देण्यात आली.यंदाच्या मोसमातील पहिला पूर असल्याने अनेकांनी पूर पाहण्यासाठी थेट पुलावर गर्दी केली, काहींनी सोशल मीडियावर समाधान मानले. पुढील तीन दिवस रेड ऍलर्ट देण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

काल (दि.11)दोन वाजेनंतर दहाहजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.त्यामुळे चार वाजेनंतर गोदावरीला पूर आला होता.पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.गर्दी पांगविण्यासाठी पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले.वाहतूक खोळंबू नये यासाठी लाऊडस्पिकरवर सूचना देण्यात आल्या. व्हिक्टोरिया पुलावर सेल्फी घेणार्‍यांना समज देण्यात आली.
दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी
सततच्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे दुतोंड्या मारूतीच्या मानेपर्यंत पाणी सायंकाळी सहावाजेच्या सुमारास लागले.पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *