धरणे ओव्हर फ्लो, गोदावरीला पूर

गंगापूर धरणातून दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्हयात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हयातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नद्या, नाले, तळे, ओढे ओसंडून वाहत आहेत. धरण क्षेत्राच्या पानलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठयात वाढ झाली आहेत. तर जिल्हयातील अनेक धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.
जिल्हयासमोर अवघ्या चार दिवसापूर्वी पाणी टंचाईचे संकट होते. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुर आल्याने जिल्हयातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे पुराचा सामना आता नागरिकांना करावा लागत आहे.
राज्यात धो धो बरसणार्‍या पावसाने नाशिककडे मात्र पाठ फिरवली होती. संपूर्ण जून महिना संपला तरी शहरात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. मात्र जुलै महिन्यात अवघ्या चार दिवस झलेल्या जोरदार पावसाने बॅकलॉक भरून काढला आहे. तसेच 11 ते 14 जुलै या कालावधीत जिल्हयाला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतीचे नुकसान
पावसाला सुरूवात झाल्यानंतर ग्रामीण भागात पेरणीला सुरूवात करण्यात आली होती. मात्र सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकर्‍यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
गोदावरीला पूर, व्यावसायिक सुरक्षित स्थळी
शहरासह जिल्हयाच्या अनेक भागात झालेल्या मुसधार पावसामुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर शहरात गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पुर आला आहे.

जिल्हयातील धरणे उपलब्ध पाणीसाठा ( टक्केवारी)
गंगापूर धरण समुह
गंगापूर धरण – 55 %
कश्यपी – 31 %
गौतमी गोदावरी – 41 %
आळंदी प्रकल्प – 44 %
पालखेड धरण समुह
पालखेड 49 %
करंजगवण 44 %
वाघाड- 54 %
ओझरखेड – 38 %
पुणेगाव- 70 %
तिसगाव- शुन्य टक्के
दारणा – 67 %
भावली- 65%
मुकणे – 51%
वालदेवी- 15%
कडवा – 69 %
नांदुर मधमेश्‍वर- 92 %
भोजापूर- 05 %
गिरणा खोरे धरण समूह
चणकापूर – 45 %
हरणबारी- 66 %
केळझर- 20 %
नागासाक्या- 04%
गिरणा धरण – 34 %
पुनद – 56%
माणिकपुंज- शुन्य टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *