पूरपरिस्थितीत गर्दीस प्रतिबंध करावा : गमे

 

नाशिक : प्रतिनिधी

पावसाळ्यात नद्यांना येणारा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात . अशावेळी अनुचित घटना घडू नये यादृष्टीने होणाऱ्या गर्दीवर प्रतिबंध करावा . शहरी भागातील काझीगढी , सराफ बाजार , जुने व धोकादायक वाडे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे , असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत सांगितले . पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी बचाव पथकांची गावनिहाय यादी तयार कराव्या . धरणविसर्गात नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांनी एकत्रितपणे पाणीपातळीचे मार्किंग नव्याने करून घ्यावे , असेही गमे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *