आयात शुल्क तिप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
मागील चार वर्षांतील बेदाणा आयात
वर्ष टन
2024-25 31,285
2023-24 29,468
2022-23 26,646
2021-22 28,081
लासलगाव : समीर पठाण
मागील काही वर्षांपासून वाढलेल्या बेदाणा आयातीचा फटका स्थानिक उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी बेदाणा आयात धोरणात बदल करत आयातीवर निर्बंध लादण्याची मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, व्यापारी, शेतकरी राज्य आणि केंद्र सरकारकडे करू लागले आहेत. बेदाण्यावरील आयात शुल्क तिप्पट करण्याची मागणी त्यांच्याकडून केंद्र सरकारला करण्यात येणार आहे.
अफगाणिस्तान, चीन, ग्रीससह इतर देशांतून भारतात मोठ्या प्रमाणावर बेदाणा आयात होत आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा वाटा सर्वाधिक आहे. 2024-25 या वर्षात देशात एकूण 31 हजार 285 टन बेदाण्याची आयात झाली होती. यांपैकी तब्बल 29 हजार 453 टन बेदाणा एकट्या अफगाणिस्तानमधून आला आहे. त्याखालोखाल चीनमधून मोठ्या प्रमाणावर बेदाणा भारतात दाखल झाला आहे. येथून 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये एक हजार 817 टनाने आवक
वाढली.
सांगली, सोलापूर व नाशिक या जिल्ह्यांत बेदाणा उत्पादन होते. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक बेदाणा तयार होतो. याशिवाय कर्नाटकातही मोठ्या प्रमाणावर बेदाण्याची निर्मिती होते. राज्यात तयार होणारा बेदाणा वर्षभर देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीस जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, हवामान बदल आणि द्राक्ष उत्पादन घट यामुळे बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्याने दरही चांगले राहिले आहेत. अशा परिस्थितीत दोन वर्षांपासून आयात होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र आहे.
अफगाणिस्तानमधून येणार्या बेदाण्याला आयात शुल्क नाही. इतर देशांतून भारतात येणार्या बेदाण्याला आयात कर आहे. त्यामुळे आयात कर वाचविण्यासासाठी व्यापारी चीन, इराक, इराण आणि पाकिस्तानचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे देशात पोहोचत आहे. हा बेदाणा निकृष्ट दर्जाचा असून त्यावर रंग लावून त्याची विक्री केली जात आहे, असे व्यापार्यांनी सांगितले.
पाच महिन्यांपूर्वी चीनचा बेदाणा बाजारात विक्रीस आला होता. त्यानंतर दुसर्यांना अफगाणिस्तानचा म्हणून चीनचा बेदाणा सौद्यात आणला आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीरमार्गे येणार्या या बेदाण्याची झळ स्थानिक बेदाणा उत्पादकांना बसत आहे.
केंद्राची चुकीची धोरणे आयातवाढीस कारणीभूत
आहेत. त्यामुळे द्राक्ष संघाने मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी आयातीचे धोरण बदलण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र, त्याकडे अद्यापही लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा केंद्राकडे धोरण बदलासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
– कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघपंधरा वर्षांपूर्वी बेदाण्याला प्रतिकिलोस शंभर रुपये, असे आयात शुल्क आकारले जात होते. मात्र, आयात कराचे धोरण बदलल्याने सद्यस्थितीला 100 टक्के अधिक जीएसटी असा आयात कर लागू आहे. आता केंद्राने प्रतिकिलोस 300 रुपये अधिक जीएसटी असा आयात कर करावा, अशी आमची मागणी आहे.
– सुशील हडदरे, बेदाणा, व्यापारी
Currant imports hit local producers
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…