नाशिक

मालेगावमध्ये दीड महिन्यानंतर थंडीचा जोर कमी

किमान तापमानात हळूहळू वाढ, मात्र वातावरणात गारवा कायम

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहर व तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने अनुभवास येत असलेल्या तीव्र थंडीला अखेर काहीसा उतार लागल्याचे चित्र दिसत आहे. 27 डिसेंबर 2025 पासून तापमानात सुधारणा होण्यास सुरुवात झाली असून, मागील चार दिवसांत किमान तापमानात सुमारे अडीच अंश सेल्सिअसची वाढ नोंदविण्यात आली आहे. तथापि, दुपारचे चार तास वगळता सकाळी व रात्रीच्या वेळी वातावरणात अजूनही सौम्य थंडीची लाट कायम असल्याने नागरिकांना गारवा जाणवत आहे.
यंदाचा हिवाळा मालेगावसाठी विक्रमी ठरला. तब्बल 40 वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच मालेगाव शहर व तालुक्यात किमान तापमान 7.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. या तीव्र थंडीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. पहाटे व रात्रीच्या वेळेत गार वारे, धुके आणि थंड वातावरणामुळे नागरिकांना उबदार कपडे, शाली, स्वेटर, तसेच शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत होता. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना थंडीचा अधिक त्रास सहन करावा लागला.
तापमानात झालेल्या तीव्र घसरणीनंतर हळूहळू सुधारणा सुरू झाली. सुरुवातीला किमान तापमान 9 अंश सेल्सिअसवर स्थिर झाले. त्यानंतर गेल्या आठवडाभरात ते 10.2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. नववर्षाच्या सुरुवातीपासून तापमानात आणखी सुधारणा होऊ लागली असून, मागील दोन दिवसांत किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
हवामान नोंदी पाहता, 27 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत कमाल तापमान साधारणपणे 25 ते 27 अंश सेल्सिअसदरम्यान राहिले आहे. 27 ते 31 डिसेंबरदरम्यान किमान तापमान सातत्याने 10.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 1 जानेवारी 2026 रोजी किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस झाले, तर 2 व 3 जानेवारी रोजी त्यात लक्षणीय वाढ होऊन ते 12.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. 4 व 5 जानेवारी रोजीही किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
एकंदर पाहता, तापमानात सुधारणा होत असली तरी मालेगाव शहर व तालुक्यातील थंडी पूर्णपणे ओसरलेली नाही. पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता असून, हळूहळू हिवाळ्याचा कडाका कमी होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

The cold weather has eased in Malegaon after a month and a half.
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago