नाशिक

34 वर्षांनंतर बदलला अभ्यासक्रम, शिक्षकांना समग्र प्रशिक्षण

पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण

सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 नुसार इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम तब्बल 34 वर्षांनंतर बदलण्यात आला आहे. भारतातील हा पहिलाच एकात्मिक व समग्र दृष्टिकोन असलेला शैक्षणिक प्रकल्प आहे. या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीसाठी अध्यापन करणार्‍या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
शहरातील संजीवनी प्राथमिक शाळा, सरदवाडी येथे हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणामध्ये समग्र कार्ड कसे तयार करावे, क्षमतेवर आधारित अध्यापन कसे करावे, नवीन कृती आधारित उपक्रम, आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम आराखड्याचे संकल्पनात्मक व प्रात्यक्षिक स्वरूप यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
गटविकासाधिकारी अशोक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सनियंत्रक विस्ताराधिकारी विजय बागुल, कैलास सांगळे, विषयतज्ज्ञ संदीप गीते यांनी नियोजन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गोरक्ष सोनवणे, गणेश वामन, विजय खतोडे, नवनाथ सांगळे, राजेंद्र कोकाटे, शक्ती महाजन, सतीश बनसोडे, किरण धोक्रट आणि अरुण बेलदार यांनी काम पाहिले.

नैसर्गिक जिज्ञासेवर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब

नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेवर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब होत आहे. हे प्रशिक्षण शिक्षकांना या बदलास तयार करत असून बालकेंद्रित शिक्षण पद्धती शाळांमध्ये प्रभावीपणे राबवता येणार आहे.
– गोरक्ष सोनवणे, तज्ज्ञ शिक्षक

कृतिशील शिक्षणाला महत्त्व

इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मूलतत्त्व, भाषा विकास, अनुभवाधारित व कृतिशील शिक्षण या सर्व घटकांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना या नव्या दृष्टिकोनानुसार अध्यापन करता येईल. बदलत्या शिक्षणपद्धतींशी शिक्षक जुळवून घेऊन विद्यार्थ्यांना सक्षमपणे शिकवू शकतील.
– राजेश डामसे, गटशिक्षणाधिकारी, सिन्नर

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

54 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago