राज्य उत्पादन शुल्क, दिंडोरी पोलिसांकडे दारूबंदीची मागणी
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील वणी खुर्द येथे नऊ ठिकाणी अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. आक्रमक महिलांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक कार्यालय, तसेच दिंडोरी पोलीस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देत दारूबंदी करण्याची मागणी केली.
गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जाऊन जिवाला मुकले आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. गावात दारूबंदीसाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र त्याची दखल घेतली नाही. आक्रमक महिलांनी नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन कैफियत मांडत रोष व्यक्त केला. दिडोरी पोलीस ठाण्याकडे निवेदनाद्वारे दारूबंदीची मागणी केली. यावेळी सरपंच आशा रेहरे, सोनाली धुळे, वंदना बोरसे, लक्ष्मी शेवरे, भारती चव्हाण, शकुंतला शेवरे, सीमा भोसले आदी महिला उपस्थित होत्या.
दिंडोरीच्या पश्चिम भागात दारू विक्रीचे दुकानेच नाहीत, तरीही अवैध दारू विक्री करणारांकडे दारूचे बॉक्स येतातच कस? राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदारांना बॉक्स विक्रीची परवानगी दिली तर नाहीना, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.
आतापर्यंत पोलिसांना दोन वेळा निवेदने दिली. नाशिक ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनाही निवेदन दिले. मात्र, गावात राजरोस अवैध दारूविक्री सुरू आहे, आज दिलेल्या निवेदनावर कार्यवाही झाली नाही, तर सर्व नागरिक उपोषणाला बसतील.
– आशा सोमनाथ रेहरे, सरपंच, कोचरगावदारूबंदीचे गावाने ठरविले आहे. दारू विक्री करणार्यांवर कारवा केली जाईल. यापुढे गाव परिसरात दारू विक्री होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
– रघुनाथ शेगर, पोलिस निरीक्षक, दिंडोरी
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…