नाशिक

सिन्नरच्या व्यापार्‍याची फसवणूक करणारा सायबर भामटा अटकेत

सिन्नर : प्रतिनिधी
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्‍याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्‍या सायबर भामट्यास गजाआड करण्यात नाशिक ग्रामीणच्या सायबर शाखेला यश आले आहे. अमेय अरविंद जैन (29, रा. अत्रेय राजराजेश्वरी, काळेनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी फसवणूक झालेल्या सिन्नरच्या व्यापार्‍यास दोन लाख दोन हजार रुपये परत मिळवून दिले.

सिन्नरच्या एका व्यापार्‍याची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल नंबरवरून संपर्क करून ट्रस्ट इंडिया डॉट कॉम या वेबसाइटवर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. नंतर त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपव्दारे एका अ‍ॅपची लिंक पाठविली. त्यांनी ती ओपन केली असता, त्यांच्या मोबाइलमध्ये बायनान्स या नावाचे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सदरचे अ‍ॅप डाउनलोड केले व त्यावर युडीएसटीची खरेदी केली. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून सायबर भामट्यांनी वेळोवेळी ट्रस्ट इंडिया डॉट कॉम या वेबासाइटवर पैसे गुंतवण्यास सांगून विविध बँक खात्यांवर तक्रारदाराकडून पैसे स्वीकारून एकूण 64 लाख 80 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार सुवर्णा आहिरे, सुनील धोक्रट, आकाश अंबोरे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांनी करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करत त्यास नाशिक शहरातून अटक केली. तसेच यातील फिर्यादीचे 2,02,000/- रुपये तक्रारदारास परत मिळवून दिले.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

22 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

23 hours ago