शनिवारपासून पाणीयोजनेचा किमान एक पंप सुरू होण्याची अपेक्षा
सिन्नर : प्रतिनिधी
कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी बनवण्यात आलेल्या विशेष स्पेसिफिकेशनचा ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध होत नसल्याने नगरपालिकेने अखेर इंदोर येथून 1000 केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध केला आहे. आज शनिवारी (दि.18) सकाळी 6 वाजेपर्यंत हा ट्रान्स्फॉर्मर सिन्नरला पोहोचणार असून, दुपारी 12 वाजेपर्यंत तो योजनेवर बसवून किमान एक पंप सुरू करण्याचे नियोजन नगरपालिकेने केल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कदम, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत मेश्राम यांनी दिली.
470 अश्वशक्तीचे दोन पंप कडवा पाणीपुरवठा योजनेवर बसवण्यात आले आहे. त्यासाठी 2000 केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला आहे. मात्र, गेल्या शुक्रवारी हा ट्रान्स्फॉर्मर फेल झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. औरंगाबाद येथे हा ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला असून, त्यासाठी किमान 21 दिवस लागणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एवढ्या दिवस सिन्नरकरांची पाण्यासाठी वणवण होईल ही बाब हेरून नगरपालिकेने इंदोर येथून एक हजार केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध केला आहे. त्यावर योजनेच्या दोनपैकी किमान एक पंप सुरू झाल्यास सिन्नरकरांची पाणीटंचाई निम्म्याने कमी होण्यास मदत होणार आहे.
सिन्नर शहरात टँकरने पाणीपुरवठा
दारणा आणि कडवा दोन्ही पाणीपुरवठा योजना नियमित सुरू राहिल्यास सिन्नर शहराला दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी दररोज किमान एक कोटी 50 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या पळसे पाणीपुरवठा योजनेतून 30 लाख लिटर तर एमआयडीसीकडून 15 लाख लिटर पाणी उचलले जात आहे. शहरात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नगरपालिकेच्या वतीने 20 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. तर क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 15 टँकर पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय, काही माजी नगरसेवक आपापल्या परीने आपापल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करत आहेत.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…