पंचवटी : प्रतिनिधी
भिवंडी शहरात धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेची आणि जीवितहानीची पुनरावृत्ती नाशिक शहरात होऊ नये, यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेत पंचवटी विभागात धोकादायक वाडे पाडण्याची धडक कारवाई करण्यात आली.
कारवाईपूर्वी नगर नियोजन विभागामार्फत संबंधित वाडामालकांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वाड्यांमधील वास्तव्य तातडीने बंद करावे, इमारती रिकाम्या कराव्यात आणि धोकादायक भाग स्वतःहून उतरवून घ्यावा, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, मुदत उलटूनही आवश्यक ती कार्यवाही न झाल्याने महापालिकेने थेट बुलडोझर चालवत हे वाडे पाडण्यास सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान पंचवटी परिसरातील काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजा आणि सरदार चौक भागातील सुमारे सात धोकादायक वाडे पाडण्यात आले. तसेच, या भागात प्रस्तावित असलेल्या रामकाल पथ विकास प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे आणि अतिक्रमणेही तातडीने हटवण्यात आली. ही कारवाई उपआयुक्त सुवर्णा दखने, पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव आणि अधीक्षक चौधरी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत कनिष्ठ लिपिक मिलिंद जाधव, गाडीप्रमुख प्रवीण बागूल, नंदू खंडारे, राजू साळुंखे, दत्ता आहेर, विजय गरुड यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता.
Dangerous mansions in Panchavati demolished
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…