नाशिक : प्रतिनिधी
आडगाव शिवारात बेकायदेशीर दारु विकणार्यास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन साडेसहा हजारांची देशी दारु जप्त केली.
आडगाव शिवारातील डाळिंब मार्केट समोरील मोकळया मैदानात एक इसम बेकायदेशीर देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यांनी ही बातमी वरिष्ठांना सांगितली.हवालदार गायकर , शंकर गोसावी , हवालदार सोनवणे, हवालदार काळे , पोलीस नाईक समिर चंद्रमोरे यांनी सापळा रचून निलगिरी बाग आडगाव शिवार या ठिकाणी छापा टाकून विलास लक्ष्मण पवार, रा. बिडीकामगार नगर, आडगाव नाशिक हा देशी दारू विक्री करतांना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी दारू प्रिंस संत्रा बॉक्स अशा एकूण – 110 बॉटल प्रिन्स संत्रा व 05 लिटर गावठीदारू असा 6500 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम – 65 ( ई ) अनव्ये गुन्हा दाखल करून संशयिताला मुद्देमालासह आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास आडगाव पोलीस निरीक्षक करीत आहेत.