पेठ आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

दिंडोरी : प्रतिनिधी
मविप्र संचालित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बारावी कला शाखेतीली विद्यार्थिनी पूजा रमेश वरठे (वय 17) हिला 29 डिसेंबरला जुलाबाचा त्रास होत असल्याने पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, तिला सलाइन लावले असता हुडहुडी भरून ती अत्यवस्थ झाली. डॉक्टरांनी तिला अधिक उपचाराकरिता नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविले. उपचारादरम्यान गुरुवारी (दि. 1) तिचा मृत्यू झाला.

Death of a student from Peth Ashram School

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *