नाशिक : मुंबई आग्रा रोड वरील पंचवटी डेंटल कॉलेज येथुन दुचाकी जात असताना अपघात होऊन दुचाकी एम एच १९ डी जे ३६९४ ही नदी पात्रात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील गणेश सुरेश निकम (वय २३) व योगेश संजय दुसाने (वय २४, ) अंदाज न आल्याने शुक्रवारी (दि २९) रात्री ११ च्या सुमारास अपघात झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता. डॉ राहुल पाटील यांनी मृत घोषित केले. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.