नाशिक

समृद्धीचे लोकार्पण; ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती कधी?

एल्गार कष्टकरी संघटनेचा सवाल, आदिवासी पाड्यांकडेही लक्ष घालावे

नाशिक : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दिमाखात इगतपुरी तालुक्यात झाले. या महामार्गावरून हजारो वाहने दररोज सुखकर व गतिमान प्रवास करतील. मात्र, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासी, डोंगराळ, ग्रामीण व आदिवासींच्या वाड्या-पाड्यांना जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार? असा सवाल एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी
केला आहे.
एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्यांबाबत आपल्या व्यथा मांडतील, किंबहुना काहीसे वेगळे आंदोलन करतील म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या या दौर्‍यादरम्यान यंत्रणांनी नजरकैदेत ठेवल्याची माहिती संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी दिली.
नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्यातील काम व इगतपुरी ते आमणेे यादरम्यान 76 किलोमीटरचा टप्पा या महामार्गाचा लोकार्पण झाला. या सोहळ्यात समृद्धी महामार्गाच्या उभारणीपासून ते अंतिम टप्प्याच्या कामापर्यंत, समृद्धी महामार्गामुळे होणारा विकास, इकॉनॉमिक कॉरिडॉर, पर्यटन, पर्यटनस्थळांचा विकास, धार्मिकस्थळांचा विकास, औद्योगिकीकरण, दळणवळणाची गतिमानता आदी बाबींचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला.
हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारा प्रोजेक्ट आहेच. म्हणून या महामार्गाच्या कामाबद्दल शासनाचे एल्गार कष्टकरी संघटनेने कौतुक केले. मात्र, आदिवासींच्या डोंगराळ, वाड्यापाड्यांकडे जाणार्‍या उद्ध्वस्त रस्त्यांकडेही शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील रस्तेही दर्जेदार व मजबूत करून आदिवासी समाजाच्या वाड्या-पाड्यांच्या विकासात, परिसराच्या विकासात भर घालावी, अशी अपेक्षाही या संघटनेने व्यक्त केली आहे.

संघटनेचे काही पदाधिकारी यांनी या रस्त्यांच्या कामाबाबत तसेच वैतरणा धरणाच्या अतिरिक्त जमिनीचा प्रश्न, जलजीवन योजनेतील त्रुटी, युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची भेट घेण्यासाठी इगतपुरीकडे प्रस्थान केले होते. मात्र, प्रशासनाने या पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्री व मंत्रिमहोदयांपर्यंत पोहोचू दिले नाही, याची खंत वाटते.
– भगवान मधे, अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago