रुग्णसंख्या 82 वर उपाययोजना पडताहेत तोकड्या
नाशिक : प्रतिनिधी
शहरात ऐन सणासुुदीच्या तोंडावर डेंग्यूचा उद्रेक पहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या वीस दिवसांतच रुग्णांची संख्या तब्बल 82 वर पोहोचली आहे. तर जानेवारी ते ऑक्टोबरमधील रुग्णसंख्या 264 वर गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जाणार्या उपाययोजना तोकड्या ठरत असल्याचे यावरून
दिसत आहे.
यंदा पावसाने विश्रांती दिली असली तरी, डेंग्यूबांधितांची संख्या लक्षणीय वाढत असल्याने शहरात डेंग्यू कमालीचा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. डेंग्यूपाठोपाठ तापसदृश आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून, साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. आरोग्य विभागाने शहरात डेंग्यू शोधमोहीम हाती घेतली असता शासकीय कार्यालयाच्या आवारात डेंग्यूचे डास आढळल्याने संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या. तर शहरात डेंग्यू व स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढतच असल्याने प्रशासनाने मध्यंतरी सहाही विभागांत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. याकरिता आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती शहरातील प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय करण्यात आली. पथकात आशासेविका, बहुद्देशीय आरोग्य सेवक, ए.एन.एम. यांच्यासह मनपाचे कीटक नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगार व क्षेत्रीय कर्मचार्यांचा समावेश करून नागरिकांची तपासणी व डेंग्यूचे स्पॉट स्पष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. दरम्यान, विविध उपाययोजना करूनही आरोग्य विभाग हतबल झाल्याचे चित्र आहे.
Dengue outbreak in the city
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…