महाराष्ट्र

सरकारी खर्चात 20 टक्के कपातीचे आदेश

‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा वाढता ताण लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सरकारी विभागांना खर्चात तब्बल 20 टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि ’लाडकी बहीण’ योजनेला मात्र या कपातीचा धक्का लागणार नाही. याशिवाय, शिक्षण-शिष्यवृत्ती, शालेय पोषण आहार आणि सार्वजनिक आरोग्य या कपातीतून वगळण्यात आले आहेत.
अल् निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, अनेक भागात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती आहे. वित्त विभागाने सर्व सचिवांची बैठक घेऊन राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना दिली. जागतिक आर्थिक मंदी आणि शिक्षण, आरोग्य, कर्जमाफी सुरक्षित
खर्चाला कात्री लावताना सरकारने सर्वसामान्यांशी संबंधित कल्याणकारी योजनांना मात्र पूर्णपणे वगळले आहे. यामुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पुढील योजनांच्या निधीत कोणतीही कपात केली जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना- दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता सुरूच राहणार आहे. शिक्षण- शिष्यवृत्ती, शालेय पोषण आहार तसेच सार्वजनिक आरोग्य आणि शेतकरी कर्जमाफी योजनेला कपातीतून संरक्षण देण्यात आले आहे. विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेचा निधी इतरत्र वळवला जात असल्याचा आरोप होत असतानाच सरकारने या योजनेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

Orders issued for a 20 percent cut in government expenditure

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गांधीनगरमध्ये होणार 65 फुटी रावणाचे दहन

सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…

28 minutes ago

श्री कालिका माता यात्रोत्सव

नाशिक : श्री कालिका माता यात्रोत्सवात लहान-मोठ्यांचे आकर्षण ठरलेले रहाटपाळणे विद्युत रोषणाईमुळे असे विलोभनीय दिसतात.…

34 minutes ago

‘बाळा’ला सजवण्याचा नादच खुळा!

सोशल मीडियावर लहान मुलांचे देवीरूपातील फोटोशूट व्हायरल नाशिक : देवयानी सोनार सध्या सोशल मीडियावर एक…

38 minutes ago

बीएसएनएलचा 1 रुपयात 24 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…

52 minutes ago

भरधाव कारच्या धडकेत पोलीस अधिकारी ठार

सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या…

55 minutes ago

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार

जुहूतील पुष्पा पार्क येथे वर्दळीत थरार, अभिनेता सुरक्षित मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर…

1 hour ago