मुंबई : प्रतिनिधी
टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीच्या फक्त 1 रुपयाच्या प्लॅनने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ’बीएसएनएल’च्या या खास ऑफरचे नाव फ्रीडम 2.0 असे आहे. कंपनीने या प्लॅनची मुदत नुकतीच वाढवली असून आता हा प्लॅन 9 नोव्हेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे.
या 1 रुपयाच्या एफआरसी म्हणजे पहिल्या वेळच्या रिचार्ज कूपनमध्ये ग्राहकांना 24 दिवसांची वैधता मिळते. त्यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग करता येते. रोज 1जीबी हाय-स्पीड 4-जी डेटा म्हणजे एकूण 24 जीबी डेटा मिळतो. रोज 100 एसीम्स म्हणजे म्हणजे एकूण 2,400 एसएमएस मिळतात. यात एक मोफत 4-जी सिम समाविष्ट
असते.
देशातील सर्वात स्वस्त रिचार्ज म्हणून याकडे पाहिले जात आहे. रोजचा खर्च काढला तर तो फक्त 4 पैसे इतका येतो. ही ऑफर सगळ्यांसाठी नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की हा प्लॅन फक्त नवीन सिम घेणार्या ग्राहकांसाठीच आहे. जुन्या ’बीएसएनएल’ ग्राहकांना याचा लाभ घेता येणार नाही. तसेच एका सिमवर हा लाभ फक्त एकदाच घेता येतो. एकदा 24 दिवस संपले की, पुढे नंबर सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या नेहमीच्या रिचार्ज प्लॅनपैकी एक करावा लागेल. आधी या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता दिली जात होती, आता ती कमी करून 24 दिवस करण्यात आली आहे, तरीही 1 रुपयात मिळणार्या फायद्यांमुळे हा प्लॅन लोकप्रिय ठरत आहे. बीएसएनएल’ने अलीकडेच स्वदेशी तंत्रज्ञानावर देशभरात 1 लाखांहून अधिक 4-जी साइट्स सुरू केल्या आहेत. स्वस्त प्लॅनच्या जोरावर कंपनी आपला ग्राहकवर्ग वाढवण्यावर भर देत आहे. नवीन सिम घेण्यासाठी जवळच्या ’बीएसएनएल’ ऑफिस, अधिकृत रिटेलर किंवा बीएसएनएल च्या वेबसाइटवर संपर्क साधता येईल.
BSNL offers unlimited calling and data for 24 days at just ₹1
सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…
नाशिक : श्री कालिका माता यात्रोत्सवात लहान-मोठ्यांचे आकर्षण ठरलेले रहाटपाळणे विद्युत रोषणाईमुळे असे विलोभनीय दिसतात.…
सोशल मीडियावर लहान मुलांचे देवीरूपातील फोटोशूट व्हायरल नाशिक : देवयानी सोनार सध्या सोशल मीडियावर एक…
‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…
सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या…
जुहूतील पुष्पा पार्क येथे वर्दळीत थरार, अभिनेता सुरक्षित मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर…