नाशिक

देवळाली कॅम्प माजी सैनिकाची आत्महत्या.

देवळाली  कॅम्प : प्रतिनिधी
येथील शिगवे बहुला येथील बाबू मुन्ना कनोजिया, वय 53 वर्ष, राहणार बेरड गल्ली, शिंगवे बहुला या एक्स सर्विसमन इसमाने स्वतःचे सिंगल बोअर लायसन्स्ड रायफल मधून स्वतःचे हनुवटी खालून गोळी मारून घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार व त्यांना मिळालेल्या माहतीनुसार  सदर इसम  गुरुवारी रात्री राहत्या घरी स्वतःच्या हनवटिवर गोळी झाडून आत्महत्या केली असून सदर इसम सतत दारू पिण्याचे व्यसन होते. घरात तो आणि त्याची २५ वर्षे वयाची मुलगी असे दोघेच राहण्यास होते. त्याची पत्नी लहान मुलांना सांभाळण्याचे काम करते. ती कामानिमित्त मुंबई दिल्ली गोवा अशा ठिकाणी तीन महिने, चार महिने जात असते. एक मुलगा असून तो पुणे येथे जॉब करून शिक्षण घेत आहे. सदर बाबत एडीआर दाखल करून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लियाकत पठाण करत आहे.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago