नाशिक

महायुतीवर उपमुख्यमंत्री शिंदेच निर्णय घेतील : ना. उदय सामंत

शिवसेनेचे हर घर अभियान

नाशिक : प्रतिनिधी
आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज राहून ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी प्रभागात, गण, गटात घरोघरी जाऊन शिवसेनेच्या कामाची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. निवडणुका महायुतीतच लढवल्या जातील. मात्र, त्यासंदर्भात शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हेच बोलतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.

‘घरोघरी शिवसेना’ हे अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू केले जाणार आहे.
यासंदर्भातील बैठक उदय सामंत, मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झाली. बैठकीच्या सुरुवातीला काल अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे मान्यवरांनी कोणतेही हार, गुच्छ यांचा स्वीकार न करता अपघातातील मृतांंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी नाशिक शहरातील तीनही विधानसभेत एक-एक लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले असून, आजपावेतो झालेल्या शिवसेना सदस्य नोंदणीचा आढावा दिला. आगामी काळात घरोघरी जाऊन ऑफलाइन सदस्य नोंदणी करताना शिवसेनेने केलेली कामे, राबविलेल्या योजना जनतेला सांगून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यास सांगितले.
या बैठकीस शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उपनेते विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख काशीनाथ मेंगाळ, गणेश कदम, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, संजय दुसाने, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, माजी आमदार पांडुरंग गांगड, निर्मलाताई गावित, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, दिगंबर मोगरे, शशिकांत कोठुळे, अमोल सूर्यवंशी, विधानसभाप्रमुख रोशन शिंदे, जीवन दिघोळे, उपमहानगरप्रमुख सुधाकर जाधव, आनंद फरताळे, उमेश चव्हाण, नितीन साळवे, विक्रम कदम, कल्पेश कांडेकार, बबलू सूर्यवंशी, आकाश पवार, श्रावण पवार, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, जॉय कांबळे, जयश्रीताई खर्जुल, इंदुमती नागरे, आर. डी. धोंगडे, सचिन भोसले, रवी पगारे, अमोल जाधव, राहुल बोराडे, विक्रम नागरे, भिवानंद काळे, सनी रोकडे, योगेश वाणी, प्रशांत आढाव, लकी ढोकणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णाताई मटाले, मंगलाताई भास्कर, पूजाताई धुमाळ, शामलाताई दीक्षित, युवती सेना जिल्हाप्रमुख हर्षदा गायकर, योगिता ठाकरे, युवासेना जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, सदानंद नवले, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, आदित्य बोरस्ते, विशाल आकाश कोकाटे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, महानगरप्रमुख शुभम पाटील, आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक शहरातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी घरोघरी जाऊन शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेतले. ते मान्यवरांना शिवसेनेचे पदाधिकार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश म्हस्के व योगिता ठाकरे यांच्या हस्ते जमा करण्यात आले.

…तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू

विधानसभा निवडणुकीत व निवडणुकीनंतर अनेक विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल, असे सांगितले, पण जोपर्यंत आकाशात सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago