नाशिक

गुंडाळलेल्या सुतातून वटवृक्षाची मुक्तता!

राजीवनगरच्या हिरकणी हास्य क्लबचा सामाजिक उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमा हा सुवासिनींचा महत्त्वाचा सण! त्या दिवशी सुवासिनी एकत्रितपणे वटवृक्षाचे पूजन करतात. मनोभावे पूजा करून आशीर्वाद मागतात. वटवृक्षाला सूत गुंडाळणे हा पारंपरिक चालत आलेला रिवाज आहे. परंतु दुसर्‍या दिवशी वटवृक्षाला गुंडाळलेले सूत, पायाशी पडलेले निर्माल्याचे ढीग हे पाहून राजीवनगर येथील हिरकणी हास्य क्लबच्या महिलांना वाईट वाटले. त्यांनी तातडीने गुंडाळलेले सूत काढून वटवृक्षाला बंधनातून मुक्त केले.

राजीवनगर येथील श्री स्वामी समर्थ उद्यानात हास्य क्लबच्या महिला नेहमीच येतात. या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाजवळ वटपौर्णिमेला मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी पूजन केले होते. पूजेनंतर निर्माल्य तेथेच ठेवून गेल्या होत्या. त्यामुळे त्याचा मोठा ढीग जमा झाला होता.
सर्वच वनस्पती या सजीव आहेत. त्यांची अशी परिस्थिती पाहून खूप वेदना होतात. या वडाच्या झाडाला स्वच्छ करण्याच्या हेतूने हिरकणी हास्य क्लबच्या सर्व भगिनींनी झाडाला बांधलेले सूत, खाली पडलेले निर्माल्य गोळा करून स्वच्छता मोहीम राबवली व एक आदर्श समाजापुढे ठेवला.
हास्य क्लबच्या सर्व भगिनी ज्येष्ठ नागरिक आहेत. तरीही उत्साहाने सर्व भगिनींनी यात सहभाग घेतला व आनंदाने परिसर स्वच्छ केला. याबद्दल क्लबच्या अध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
या सामाजिक उपक्रमात क्लबच्या अध्यक्षा सविता एरंडे व लीला कुटे, सुनंदा सोनवणे, अरुणा सोनवणे, छाया पंडित, रजनी सराफ, सविता गिते, कुसुम जोशी, वासंती कुलकर्णी, सिंधू सोनारे, विजया कदम, कोकिळा चौधरी या भगिनींनी सहभाग घेतला.

पारंपरिक सण आणि उत्सव साजरे करत असताना त्या-त्या वेळेस आवश्यक असलेली स्वच्छता आणि मूळ स्वरूप त्या ठिकाणी बहाल केले पाहिजे. या भावनेतून ही स्वच्छता केली. अशाच प्रकारचा पुढाकार इतर ठिकाणीही महिलांनी घ्यावा.
– सविता एरंडे, अध्यक्षा,
हिरकणी हास्य क्लब, राजीवनगर

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago