ताटातूट : प्रकृती खालावलेल्या बछड्याला उपचारासाठी नाशिकला हलवले
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मीठसागरे शिवारात मादी बिबट्याच्या तोंडातून पडलेल्या नवजात बछड्याची प्रकृती खालावल्याने अखेर वनविभागाने रविवारी (दि. 25) त्याला उपचारासाठी नाशिक येथील टीटीसी (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर) येथे हलवले. दोन दिवस मादीला पिंजर्यात पकडून बछड्याला आईच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संजय कथले यांच्या शेतात मादी बिबट्या आपल्या चार नवजात बछड्यांचे स्थलांतर करत होती. एकाच वेळी सर्व बछडे तोंडात धरून ती एका शेतातून दुसर्या शेतात जात असताना रस्त्याने जाणार्या दुचाकीच्या आवाजाने ती गोंधळली. त्यावेळी तिच्या तोंडातून एक बछडा खाली पडला. उर्वरित तीन बछडे घेऊन ती मक्याच्या शेतात
निघून गेली.
मादी परत येईल, या अपेक्षेने शेतमालकांनी काही वेळ प्रतीक्षा केली. मात्र, ती परत न फिरकल्याने वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बछड्याला आईच्या स्वाधीन करण्यासाठी शेतात पिंजरा लावला. प्लास्टिक क्रेटमध्ये ठेवलेला बछडा पिंजर्यात ठेवण्यात आला. मादीने चार वेळा पिंजर्याभोवती चक्कर मारली; मात्र आत प्रवेश केला नाही.
दरम्यान, मादीच्या सततच्या हालचालींमुळे परिसरातील शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवस अनेक शेतकरी शेतात जाणे टाळत होते. आईपासून दूर राहिल्याने बछड्याची प्रकृती हळूहळू खालावू लागली. शनिवारी वैद्यकीय अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी करत बछड्याला अन्न व पाणी दिले. मात्र, रात्रभरातही मादी जवळ न आल्याने रविवारी सकाळी बछड्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बछड्याच्या वियोगामुळे मादी आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने तिला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मक्याच्या शेतात दोन पिंजरे तैनात करण्यात आले असून, भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. मादी पिंजर्यात अडकल्यास तिच्यासोबत असलेले उर्वरित तीन बछडेही ताब्यात घेऊन सर्वांना नाशिकच्या टीटीसी सेंटरमध्ये एकत्र ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
मादीला पकडण्यासाठी दोन पिंजरे
बछड्याला हलवण्याच्या निर्णयाला सुरुवातीला स्थानिक शेतकर्यांनी विरोध दर्शवला होता. बछड्याच्या वियोगाने मादी आक्रमक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वनमंडळ अधिकारी महेश वाघ व वनरक्षक एफ. जे. सय्यद यांनी शेतकर्यांशी चर्चा करून परिस्थिती समजावून सांगितली.
Despite two days of efforts, the calf and the female were unable to meet.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…