ना. झिरवाळ : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
“शेतकर्यांनी आज आर्थिक संपन्नता आणि भौतिक प्रगती साधली. करोडोचे बंगले, गाड्या, भौतिक सुखाची सर्वसाधने मिळवली; परंतु त्याबरोबरच दुसर्या बाजूने आपण आपला मानसिक, शारीरिक, सामाजिक र्हास होतो आहे आणि ही अत्यंत चिंताजनक बाब असल्यामुळे विषमुक्त शेतीचा गुरुमाउलींचा मंत्र घरोघरी पोचवण्यासाठी अशा कृषी महोत्सवाची गरज आहे,” असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी येथे काढले.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सोळाव्या जागतिक कृषी महोत्सवाचे शुक्रवारी (दि. 23) शानदार उद्घाटन महानगरातील यूथ फेस्टिव्हल मैदानात मोठ्या उत्साहात झाले. यानिमित्त ते बोलत होते.
व्यासपीठावर गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री झिरवाळ, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, चंद्रकांतदादा मोरे, आयोजक आबासाहेब मोरे, मविप्रचे विश्वासराव मोरे, भाजपचे लक्ष्मण सावजी, नवनिर्वाचित नगरसेवक रिद्धिश निमसे, नगरसेविका ऐश्वर्या जेजुरकर, इंदू खेताडे, योगेश क्षेमकल्याणी, कृषी अधीक्षक अभिमन्यू काशीद, विक्रांत चांदवडकर, बापूसाहेब पिंगळे सतीश मोटे आदी उपस्थित होते.
शेतकर्यांशी संवाद साधताना गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले की, शेती आणि मानसिक, शारीरिकच नव्हे, तर सामाजिक आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. आज चुकीच्या आणि विषारी अन्नामुळे कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजार वाढले असून, पुढील पिढ्यांना वाचविण्यासाठी विषमुक्त शेतीची नितांत गरज आहे. हा मंत्र देण्यासाठीच हा महोत्सव असून, शेतकर्यांनी लाभ घ्यावा. नोकरी, व्यापारपेक्षा शेतीच उत्तम आहे, असा दिवस येईल तेव्हा खरा शेतकर्याचा दिवस आला, असे समजावे, असेही गुरुमाउली म्हणाले.
शेतकर्यांसमोर विविध आव्हाने ः खासदार वाजे
शेतकर्यांसमोर आज आर्थिकच नव्हे, तर इतर अनेक सामाजिक आव्हाने उभी आहेत. त्यातून त्यांना धीर देऊन या संकटामधून त्यांची सुटका होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे मत खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले. नेपाळहून आलेल्या सेवेकर्यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी रामकुंडावरून निघालेल्या कृषिदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.
Deterioration of health along with material progress
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…