प्रथमदर्शनी खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज
नाशिकरोड : प्रतिनिधी
येथील गोरे मळ्यात एका वीस ते बावीस वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या गळ्यात ओढणीचा फास अडकविलेला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा खूनाचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सद्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास सोमनाथ जाधव यांनी पोलिसांना याबाबतची खबर दिली.शास्त्रीनगर, गोरेवाडी भागात शेतीच्या कामासाठी मजूर गेले असता त्यांना संभाजीनगरकडून एकलहरा रोडकडे जाणार्या कॅनाललगत 20 ते 22 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या गळ्यात ओढणीच्या सहाय्याने गाठ मारलेली आढळून आली. या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…