नाशिक

रामकाल पथचा विकास; व्यावसायिकांचे संरक्षण

आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांना यश, मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने पुनर्वसन

पंचवटी : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रामकाल पथ प्रकल्पातील विस्थापित दुकानदारांच्या रोजगाराचा प्रश्न नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येची दखल घेत विस्थापित व्यावसायिकांना त्याच ठिकाणी सुसज्ज गाळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. ते गाळे आता अंतिम टप्प्यात आहेत. या निर्णयामुळे उघड्यावर पडलेल्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्यापूर्वी सुमारे 98 कोटी रुपये खर्चून रामकाल पथ प्रकल्पांतर्गत परिसराचा कायापालट करण्यात येत आहे. यात दोन किलोमीटर लांबीचा मार्ग, 90 दुकाने आणि 550 जुन्या वास्तूंचे सुशोभीकरण करण्याचे काम मुंबईच्या स्काय वे कंपनीमार्फत वेगाने सुरू आहे. मात्र, या विकासकामादरम्यान स्थानिक दुकानदारांची अतिक्रमित दुकाने हटवण्यात आली होती. यामुळे लहान-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्‍या स्थानिक दुकानदारांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती.
आपली रोजीरोटी हिरावली गेल्याने त्रस्त झालेल्या स्थानिक व्यापार्‍यांनी आमदार राहुल ढिकले यांची भेट घेऊन सहानुभूतीपूर्वक पुनर्वसन करण्याची आणि त्याच परिसरात छोटे-मोठे गाळे मिळवून देण्याची मागणी केली होती. नागरिकांची ही व्यथा लक्षात घेऊन आमदार ढिकले यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रामकुंडावरील विकासकामांसोबतच स्थानिकांच्या रोजगाराचे रक्षण करणे तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेत व्यापार्‍यांसाठी सुसज्ज गाळे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

Development of Ramkal Path; protection for business owners

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago