सिडको : प्रतिनिधी
नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांचे दागिने चोरणार्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 43 हजार रुपये किमतीचे 163 ग्रॅम 66 मिलिग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे सरकारवाडा, पंचवटी आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांतील चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. जावेद अब्दुल गफ्फार (वय 40) आणि अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (वय 56, दोघेही रा. जिल्हा बिजनौर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
शहरातील बसस्थानक परिसरात होणार्या चोर्यांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी पथक नियुक्त केले होते. दि 13 ऑक्टोबर रोजी पथकातील पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे आणि मुक्तार शेख यांना बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खातरजमा करून परिसरात सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संशयितांनी नाशिक शहरातील सरकारवाडा परिसरात सात, पंचवटीत एक आणि मुंबई नाका परिसरात दोन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 24 लाख 43 हजार रुपये आहे. या कारवाईत सरकारवाडा पोलीस ठाण्यातील 2024 आणि 2025 मधील आठ, पंचवटी पोलीस ठाण्यातील 2026 मधील एक आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातील 2026 मधील दोन गुन्ह्यांची नोंद प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. मात्र, या यादीतील सरकारवाडा येथील सात गुन्हे आणि इतर दोन पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक गुन्हा, असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट- 1 च्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.
Interstate gang committing thefts in bus station area arrested
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…