नाशिक मध्य मतदार संघातून अखेर देवयानी फरांदे यांनाच उमेदवारी

नाशिक: पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे नाशिक मध्य मतदार संघातील विध्यमान आमदार देवयानी फरांदे यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर माजी नगरसेवक घेऊन जात मोठे शक्तिप्रदर्शन देखील केले होते . मात्र अखेर आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता नाशिक मध्य मतदार संघात ठाकरे गटाचे वसंत गीते विरुद्ध देवयानी फरांदे आणि उमेदवारी मिळावी म्हणून अडून बसलेल्या काँग्रेसच्या हेमलता पाटील असा तिरंगी सामना रंगणार आहे.

नाशिक पूर्व मधून गीते

नाशिक पूर्व मधून माजी स्थायी सभापती गणेश गीते यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे तर येवल्यातून छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजून चांदवड चा तिढा कायम आहे.  तर इगतपुरी मतदार संघात देखील निर्मला गावित यांना अजून प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *