मनमाड नांदगाव मतदार संघात महायुतीत उभी फूट,आरपीआयचा समीर भुजबळ यांना पाठिंबा

मनमाड नांदगाव मतदार संघात महायुतीत उभी फूट

छगन भुजबळ कोणत्याही पक्षात असले तरी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू प्रकाश लोंढे यांची घोषणा

मनमाड : आमिन शेख

मनमाड नांदगाव मतदारसंघात महायुतीत उभी फुट पडली असुन महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आलेला पाठिंबा हा अनधिकृत असुन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिले आहेत महायुतीचे काम करायचे नाही कोणी काम केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल यामुळे आम्ही जोपर्यंत आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मनमाड शहराध्यक्ष दिलीप नरवडे, तालुकाध्यक्ष कैलास आहिरे,उत्तर महाराष्ट्र संघटक पी आर निळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी सुहास कांदे यांना पाठिंबा जाहीर केला होता हा पाठिंबा अनधिकृत असल्याचे आज या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मनमाड नांदगाव मतदारसंघात महायुतीत रिपब्लिकन पक्ष तसेच भाजपा व इतर घटक पक्षाला शिंदे गटाकडून कायम दुय्यम वागणूक देण्यात येते याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली मात्र हम करे सो कायदा हा नियम शिंदे गटाकडून लागू करण्यात येतो आणि मोजक्याच डोक्याना सोबत घेऊन सर्व पक्ष आणि बौद्ध समाज सोबत आहे असे दाखवण्यात येते आज मात्र या सर्व गोष्टींचा बांध फुटला आणि सुहास कांदे यांना जो पाठिबा दिला तो अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले याशिवाय आम्ही जोपर्यंत पक्षाचे वरिष्ठ आदेश करत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही अशी भूमिका घेतल्याने आता महायुतीत उभी फूट पडल्याचे चित्र आहे.यात जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता रिपब्लिकन पक्ष हा विकाऊ पक्ष नाही आम्ही एकसंथ भूमिका घेऊ व मगच पाठिंबा जाहीर करू असे लोंढे यांनी सांगितले.

भुजबळ कोणत्याही पक्षात असो आम्ही त्यांच्या सोबत ; प्रकाश लोंढे
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी यावेळी भ्रमणध्वनी द्वारे संभाषण केले व सर्व पत्रकार परिषदेत सांगितले की छगन भुजबळ यांनी मुक्तिभूमी सारखी दिमागदार वास्तू आमची अस्मिता असलेला बोधिवृक्ष त्यांनी आणला करोडो रुपये निधी बौद्ध समाजाच्या विकासासाठी दिला यामुळे छगन भुजबळ कोणत्याही पक्षात असले तरी आम्ही त्यांना साथ देऊ असे स्पष्टपणे सांगितले याशिवाय पक्षाच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या वर कठोर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले.तसेच काल ज्यांनी पाठिंबा दिला तोही अनधिकृत असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *