निफाड : प्रतिनिधी
मुख्य बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जाणारा रस्ता धामोरी -कोपरगाव या राज्य मार्गावर अतिशय मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. हा रस्ता धामोरी येथील तसेच मायगाव देवी,चास नळी, मोर्वीस, मंजूर, सांगवी भुसार येथील शेतकरी वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण समजला जातो. परंतु या रस्त्यालगत महिन्यापासून खडी आणून ठेवली आहे. तरी रस्त्याच्या कामाला अजून सुरुवात झाली नाही.ही खडी रस्त्यावर विखरल्याने वाहनचालकांमध्ये लहान-मोठे अपघातही होताना पहावयास मिळते. संबंधित बांधकाम विभाग अधिकारी यांनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम चालू करून रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक, शेतकरी, वाहनचालकांकडून होत आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…