नाशिक-त्र्यंबकरोडवर धुळवड

धुळीमुळे वाहने चालविणे अवघड
नाशिक : प्रतिनिधी
पाऊस उघडल्यामुळे रस्त्यावर साचलेल्या मातीचा तसेच वाळूचा आता वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. वाहने गेल्यानंतर रस्त्यावर धुळ उठत असल्याने सद्या नाशिक-त्र्यंबक रोडवर वाहनधारक धुळीमुळे कमालीचे हैराण झाले आहेत.

शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संततधार सुरू होती. या पावसामुळे जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले होते. मात्र, आता कालपासून पाऊस उघडल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले असताना उन्हामुळे रस्ते सुकल्याने रस्त्यावर पावसामुळे वाहून आलेली माती तसेच वाळू सुकल्यामुळे त्यावरुन वाहने गेल्यावर धुळीचे लोट उठत आहेत. त्याचा परिणाम दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. डांबरी रस्त्यावरुन चालताना या धुळीमुळे दुचाकीस्वारांच्या डोळ्यात ही धुळ जात आहे. आधीच शहरातील बहूतांश भागात पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्डयांतून वाहने चालविताना कोणता खड्डा चुकवू असा प्रश्‍न दुचाकीस्वारांना पडत आहे. त्यात ही धुळवड त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्र्यंबक रोडवरील जिल्हा रुग्णालय परिसर, एबीबी सर्कल, दुध डेअरी भागात वाहने चालविणेही मुश्किल झाले आहे. विशेषत: दुचाकीस्वारांना याचा ाजस्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहने चालवावी कशी? असा प्रश्‍न या वाहनधारकांना सतावत आहे. या धुळीमुळे रस्त्याच्या कडेला बसणार्‍या विक्रेत्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *