पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, दोन जखमी
सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चोरट्यांनी थेट पोलिसांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केल्याची गंभीर घटना सोमवारी (दि. 5) पहाटे घडली. या थरारक पाठलागात महामार्ग पोलिसांचे वाहन मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले असून, दोन कर्मचार्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या घटनेत शासकीय वाहनाची पुढील काच फुटली असून, पोलीस उपनिरीक्षक उगले व सुरक्षा रक्षक कमलेश हिरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. डिझेल चोरीप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.
सोमवारी पहाटे सुमारे 5.15 वाजता समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडोरमधील चॅनल क्रमांक 547.2 या ठिकाणी एका ट्रकमधून डिझेल चोरी झाल्याचा कॉल समृद्धी नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. त्यानंतर महामार्ग पोलीस केंद्र सिन्नरचे पोलीस उपनिरीक्षक नंदू उगले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी (बीआर-24 जीडी-2778) क्रमांकाचा ट्रक उभा असल्याचे आढळून आले. ट्रकचालकाने दिलेल्या माहितीनुसार, टायर पंक्चर झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे असताना नंबर प्लेट नसलेल्या पांढर्या रंगाच्या एर्टिगा वाहनातून आलेल्या तीन ते चार इसमांनी त्याला धमकावले. त्यानंतर ट्रकच्या डिझेल टँकमधून चार ते पाच ड्रम डिझेल काढून घेत मुंबईच्या दिशेने पळ काढला.
या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक उगले यांनी मुंबई कॉरिडोरच्या दिशेने पेट्रोलिंग सुरू केली. चॅनल क्रमांक 564 दरम्यान संशयित एर्टिगा वाहन दिसताच पोलिसांनी त्याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चोरट्यांनी वाहन भरधाव वेगात पळवले. पाठलाग सुरू असतानाच चॅनल क्रमांक 568 जवळ चोरट्यांनी पोलिसांच्या शासकीय वाहनावर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत (एमएच-01 ईजे-1778) क्रमांकाच्या वाहनाची पुढील काच फुटून नुकसान झाले.
यानंतरही पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. चॅनल क्रमांक 582 येथून चोरट्यांनी मिडल एक्झिटद्वारे नागपूर कॉरिडोरकडे प्रवेश केला. घोटी, बाभळेश्वर, वावी तसेच सिन्नर पोलीस ठाण्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र चॅनल क्रमांक 541 दरम्यान अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या इसमांनी पुन्हा पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली आणि पसार होण्यात यश मिळवले.
Diesel thieves rampage on Samruddhi Highway
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…