घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस हा आज प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सध्या घरांमध्ये प्रामुख्याने एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) आणि पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) या दोन प्रकारचा गॅस वापरला जातो. या दोन्ही गॅसच्या वापरात, उपलब्धता आणि सुरक्षिततेत काही महत्त्वाचे फरक आढळून येतात.
एलपीजी (Liquefied Petroleum Gas) हा प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्यूटेन या वायूंचे मिश्रण असून, तो सिलिंडरमध्ये दाबाखाली द्रवरूपात साठवला जातो. ज्या ठिकाणी गॅस पाइपलाइनची सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणीLPG सहज वापरता येतो. सिलिंडर सहज उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली जास्त उष्णता मिळत असल्यामुळे LPG अधिक प्रभावी मानला जातो. मात्र, सिलिंडर संपल्यानंतर तो बदलावा लागतो. तसेच गॅसगळतीचा धोका तुलनेने जास्त असतो. याशिवाय सिलिंडरची साठवणूक आणि वाहतूक करावी लागते.
दुसरीकडे PNG (Piped Natural Gas) म्हणजे पाइपद्वारे थेट घरापर्यंत पोहोचणारा नैसर्गिक वायू होय. हा वायू मुख्यतः मिथेनपासून बनलेला असून, गॅस वाहिनीमधून थेट पुरवठा केला जातो. PNG मध्ये सिलिंडरची गरज नसते आणि गॅस सतत उपलब्ध राहतो. गॅसगळती झाल्यास तो हवेत पटकन मिसळत असल्यामुळे LPG पेक्षा अधिक सुरक्षित मानला जातो. वापरानुसार बिल आकारले जात असल्याने तो अधिक सोयीस्कर ठरतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही PNG हे तुलनेने स्वच्छ इंधन मानले जाते.
PNG ची सुविधा फक्त ज्या शहरांमध्ये गॅस पाइपलाइन उपलब्ध आहे तेथेच मिळते. तसेच सुरुवातीला कनेक्शन घेण्यासाठी काही प्रमाणात खर्च करावा लागतो आणि LPG च्या तुलनेत उष्णता थोडी कमी असते.
तज्ज्ञांच्या मते, ज्या ठिकाणी पाइपलाइनची सुविधा उपलब्ध आहे तेथे झछॠ हा अधिक सुरक्षित व सोयीस्कर पर्याय ठरतो. ग्रामीण भागात किंवा पाइपलाइन नसलेल्या ठिकाणी LPG हा अधिक उपयुक्त पर्याय मानला जातो.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि इंधन पुरवठ्यावर होणार्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी केंद्र सरकारने देशात PNG वापराचा अधिक विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची मागणीही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना गॅस पुरवठ्याबाबत होणार्या अडचणी टाळता येतील, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
Differences and advantages between LPG and PNG gas
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…