देशात होणार डिजिटल जनगणना

जन्म-मृत्यूची नोंदही होणार लिंक : अमित शहा यांची घोषणा

मुंबई :
कोरोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्या वर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची. पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यूबाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यामुळे देशात प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतर जनगणना आपोआप अपडेट होणार आहे. गृह मंत्रालयाने जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आसाममधील डिरेक्टोरेट सेन्सस ऑपरेशन्स इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. देशाचा विकास साधायचा असेल तर अद्ययावत जनगणना किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी अधिक भर दिला.

लेकी घराचं चांदणं

पुढील जनगणना ही ई-जनगणना असेल. जी 100 टक्के परिपूर्ण जनगणना असेल. या जनगणनेच्या आधारावर, पुढील 25 वर्षांसाठी देशाच्या विकास कामांचं नियोजन केलं जाईल, असंही ते म्हणाले. जनगणना ही विविध बाबींसाठी अत्यंत महत्त्वाची असते. आसामसारख्या राज्यात तर याचं महत्त्व अधिक वाढतं. आसाम हे राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे, असंही ते पुढे म्हणाले.

अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र

संबंधित जनगणना प्रक्रियेला जन्म-मृत्यू रजिस्टरही लिंक केलं जाणार आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याचा तपशील जनगणना नोंदणीमध्ये आपोआप जोडला जाईल. संबंधित पाल्य 18 वर्षांचा झाल्यानंतर, त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट केलं जाईल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचं नाव यादीतून हटवलं जाईल. तसेच संबंधित व्यक्तीचं नाव आणि पत्ता बदलणं देखील अधिक सोपं होईल. याचा अर्थ आपली जनगणना आपोआप अपडेट होईल, असंही अमित शहा यावेळी म्हणाले.

हे ही वाचा :

Devyani Sonar

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

1 day ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

2 days ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

2 days ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

2 days ago