नाशिक: प्रतिनिधी
शिक्षक पती पत्नीचे एकस्तर वेतनश्रेणीतील थकीत फरक बिलाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात 52 हजार रुपयांची लाच घेताना दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी व लेखा अधिकारी आणि एक शिक्षक अशा तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
जिल्हा परिषदेत लाच खोरीचे प्रकरणे चांगलेच गाजत असून, गेल्या पंधरा दिवसातली ही तिसरी कारवाई आहे. यापूर्वी बांधकाम विभागातील तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी लाच घेताना जाळ्यात सापडले होते. आता दिंडोरी पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यासह दोघांना लाच घेताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार पती पत्नी यांनी 2006 ते 2025 या कालावधीतील एकस्तर वेतनश्रेणी च्या फरक बिलाची तक्रारदारांची रक्कम ₹६,५७,८०८/- तर त्यांच्या पत्नीची ₹६,५५,६००/- मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव प्रलंबित होता. या बिलांची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा परिषद, नाशिक येथे सादर करण्यासाठी 52 हजारांची लाच मागितली होती लाचेची 1 टक्का रक्कम
गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी स्वीकारली तर
शिक्षक निलेश भारती यांनी सुरुवातीला ५% व नंतर ३% रक्कम मागितली. ही रक्कम स्वतःसाठी व जिल्हा परिषद येथील अधिकारी देविप्रसाद पाटील यांना देण्यासाठी घेतली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक सौ. नेहा सूर्यवंशी
पथक सदस्य: पो.हवा. विनोद चौधरी,पो.कॉ. अनिल गांगोडे यांनी सापळा रचला असता लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक.माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक. सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नांदेडमध्ये 47, तर अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर नवी दिल्ली/पुणे : प्रतिनिधी देशातील हवामानात सध्या…
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…
आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…