नाशिक

पशुसंवर्धन विभाग तांत्रिक कामकाजामध्ये दिंडोरी तालुका प्रथम

15 तालुक्यातील 265 पशुवैद्यकीय दवाखान्यांना कामकाजाचे लक्षांक

दिंडोरी ः अशोक केंग
नाशिक जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 15 तालुक्यात 265 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. सदर 15 तालुक्यांपैकी सर्व तालुक्यांना तांत्रिक कामकाजाचे लक्षांक वाटप करण्यात आलेे होते. त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक कामकाज मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेे आहे. जिल्ह्यामध्ये तालुक्यांना दिलेल्या लक्षांकनुसार तांत्रिक कामकाजामध्ये दिंडोरी तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील पशुगणना, लसीकरण पूर्ण झालेे असून नावीन्यपूर्ण योजना, विशेष घटक योजना, राष्ट्रीय पशुधन अभियान यामध्ये प्रभावीपणे कामकाज झाले आहे. तसेच 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व दवाखान्यांमध्ये सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती दिंडोरी येथे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ. शहाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलेख वर्गिकरण, निर्लेखन पुर्ण करण्यात येऊन तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कामधेनू मिशन योजनेतंर्गत 5 दवाखाने दुरुस्ती करण्यात येऊन पाच दवाखान्यात संगणक प्रणाली बसविण्यात आली आहे. तसेच जनावरांच्या आजाराचे योग्य व वेळेत निदान होण्यासाठी दिंडोरी येथे प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हापरिषद पशुसंवर्धन विभागातर्फे 3 गावांमध्ये जनावरांना उपचारासाठी नवीन खोडे बसविण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सर्व पशुवैद्यक यांच्या मोबाईलमध्ये श.रिीर्ही रिि कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर अ‍ॅपमुळे पशुवैद्यक यांच्या वेळेची बचत होऊन तात्काळ पशुंवर उपचार करण्यास सुलभ होत आहे.
कामधेनू दत्तक योजनेअंतर्गत तालुक्यातील 2 गावे दत्तक घेण्यात आली आहे. लस, औषधे यांची शितसाखळी व्यवस्थित राहण्यासाठी तालुक्यातील 18 दवाखान्याना नव्याने फ्रिज देण्यात आले आहेत. तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत जंतनाशक शिबिरांचे आयोजन करुन जंतनाशक औषधे वाटप करण्यात आली. या सर्व बाबींमुळे प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन नाशिक डॉ. बी. आर. नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील धांडे यांच्या हस्ते दिंडोरी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, डॉ भगवान पाटील यांचा दिंडोरी तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक, परिचर यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. दुसर्‍यास्थानी देवळा तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. पूजा घाडगे व तिसर्‍यास्थानी मालेगाव येथील डॉ. मयुरा अरबट व डॉ. मच्छिंद्र झाल्टे यांचा सत्कार करण्यात आला.

Gavkari Admin

Recent Posts

वारी…ज्ञानराज माउलींचे वरदान!

लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…

11 minutes ago

पंढरीची वारी आणि वारकरी संप्रदाय

हाराष्ट्राचे आध्यात्मिक, परमार्थिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रात भीमा नदीतीरावर असणार्‍या लोकविख्यात पवित्र तीर्थक्षेत्र…

15 minutes ago

ज्याचा त्याचा कानडा राजा पंढरीचा…

हाराष्ट्रात धर्माला फार महत्त्व दिले जाते. धर्मतेज जागवणारा पंढरीचा विठोबा हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि…

20 minutes ago

इंडो-वेस्टर्न साडीचा फॅशनेबल ट्रेंड

साडी ही भारतीय परंपरेचा गोंधळलेला मोहक गंध. पण आजच्या काळात ती केवळ साडी न राहता,…

24 minutes ago

पावसात कपड्यांवर चिखलाचे डाग?

पावसाळा म्हणजे गारवा, सरींचा आनंद आणि त्याचबरोबर अनेक अडचणीही. यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे कपड्यांवर…

33 minutes ago

अवघा तो शकुन

चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो पुण्यकाळ साधका॥ (एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166) आपण गृहप्रवेश,…

48 minutes ago