दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्याने 18 ग्रामपंचायतींना सव्वा कोटींचा निधी
विद्यमान खासदारांचे मतदार संघातील खेड्यापाड्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा केला आरोप
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदार संघातील 18 ग्रामपंचायतीना सव्वा कोटी रूपयांचा निधी मिळवून दिल्याची माहिती माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवार दि. 29 रोजी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पाटील म्हणाले , विद्यमान खासदारांनी गेल्या दहा वर्षात नाशिक लोकसभा मतदार संघातील खेड्यापाड्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. असे म्हणत त्यांनी खा.हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली. तसेच मला पक्षाने आदेश दिले आहेत त्यानुसार मी लोकसभेसाठी तयारी करत आहे. खासदार म्हणून निवडणून आल्यास मतदार संघातील ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यिास प्राध्यान्य देईल.
दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 18 ग्रामपंचायतीचे प्रलंबित असलेले पायाभूत सुविधांचे प्रश्न पुर्ण होण्यास चालना मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी दिनकर पाटील यांनी नाशिक जिल्हयातील विविध ग्रामपंचायतीना प्रलंबित असेल्या विकासकामाबद्दल प्रस्ताव मागितले होते. पाटील यांना प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी आपले प्रस्ताव पाठवले. प्रलंबित विकासकामांचे प्रस्ताव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर करत दिनकर पाटील यांनी 18 ग्रामपंचयायतींना निधी मिळवून दिला आहे. त्यामुळे स्मशानभूमि,पेव्हर ब्लॉक , सभागृह , रस्ता कॉक्रीट करणे, यासारखी कामे मार्गी लागणार आहेत. यात पांढुली ,आशापूर, पिंपळ , सदरवाडी , धोंडविरनगर, जलाजपूर-लाख,पिंपळद, वेरवळ, देवळा, वाफणविहीर, अंबोली, पिंपळगाव, मानवेढे , टाकेघोटी, खेड या ग्रामपंचायतील प्रत्येकी 7 लाख रूपये, वेळुंजे ग्रामपंचयातीला 4 लाख रूपये तर शिलापूर, देवरगाव या ग्रामपंचयातींना प्रत्येकी 8 रूपयांचा निधी मिळाला आहे . असा एकूूण सव्वा कोटी रूपयांचा निधी या 18 ग्रामपंचायतींना मिळाला आहे.
अज्ञात टवाळखोरांकडून तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट…
गंगापूर पोलिसांची कारवाई सिडको : विशेष प्रतिनिधी गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी…
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साडी…
सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…
144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…
विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…