दुचाकीवरील दोघांकडून 45 हजारांचे मंगळसूत्र लंपास
सिडको : विशेष प्रतिनिधी
दीपालीनगर भागात एका गृहिणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार दोन अनोळखी चोरट्यांनी जबरीने खेचून लंपास केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संजीवनी संतोष सोनसकर (वय 49, रा. विनयनगर, नाशिक) या दि. 4 मे 2025 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दीपालीनगर येथील सिद्धिविनायक मंदिराजवळून उजव्या बाजूच्या गल्लीतून जात असताना ही घटना घडली. त्या वेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे दहा ग्रॅम वजनाचे, सुमारे 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून पळ काढला.
या घटनेनंतर घाबरलेल्या संजीवनी सोनसकर यांनी तत्काळ मुनाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एस. शिरसाठ आणि पोउनि एम.एल. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…