सिडको : विशेष प्रतिनिधी
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील मोदकेश्वर मंदिराजवळून चोरलेल्या रिक्षा प्रकरणाचा छडा लावत गुन्हेशाखा युनिट-2 च्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना मालेगाव येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 35 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावमधील रमजानपुरा भागात दोन संशयित चोरीची रिक्षा लपवून ठेवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सना गॅरेज परिसरात सापळा रचून आरोपी अजीजोद्दीन रहमान मोहमद अकिल (24) व मुस्ताक शहा शिराज शहा (20) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी नाशिकमधून दहा महिन्यांपूर्वी रिक्षा चोरल्याची कबुली दिली.
त्याच्या सांगण्यानुसार, अजून एक रिक्षा त्यांनी भद्रकाली परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले. ती रिक्षा मालेगाव येथील अल कबीर इंग्लिश मिडीयम शाळेजवळ सापडली व ती देखील जप्त करण्यात आली.याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…