नाशिक

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षावरच ‘आपत्ती’

अडगळीच्या साम्राज्यात करावे लागते कामकाज

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कमी जागेत आहेत, तसेच कक्षाच्या आजूबाजूला कच़र्‍याचेही सामाज्य आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षावरच आपत्ती आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये जुने रेकॉर्ड, कागदपत्रे, अडगळीच्या वस्तू, कपाटे, भंगार, यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष अडगळीची खोली वाटत आहे. विभागात अधिकार्‍याला कामकाजासाठीही पुरेशी जागा नाही इतर सर्व विभागातील अधिकार्‍यांचे कक्ष हे नीटनेटके, स्वच्छ, हवेशीर असतांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाची दुरवस्था झाली आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षावरच आपत्ती असताना जिल्ह्यावर आलेले आपत्तीचे संकट कसे दूर करणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्या मजल्यावर टंचाई विभागाच्या शेजारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दहा बाय दहाची रूम देण्यात आली आहे. येथूनच जिल्ह्यातील आपत्ती निवारणाचा गाडा हाकला जातो. याठिकाणी जिल्हा आपत्ती निवारण अधिकार्‍यासह तीन कर्मचारी आपत्ती निवारणाचे कामकाज बघतात. सध्या पावसाळा सुरु झाल्याने जिल्हावासियांना पुराबाबत सूचना देणे, गोदाकाठी राहणार्या नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे, त्यांना वेळोवेळी पूर्वसूचना देणे, भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित उपाययोजना करणे, राज्यशासन आणि केंद्रसरकारच्या संपर्कात राहून माहितीची देवाणघेणाण करणे, जिल्हाप्रशासनाला वेळोवेळी आवश्यक माहिती पुरवणे, पावसासंबंधी अलर्ट देणे आदी कामे करावी लागतात. अगामी काळात सिंहस्थ होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत नियोजन केले जात आहे. तसेच पावसाळ्यात आपत्ती कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. जिल्हाधिकार्‍यांनी त्वरित लक्ष घालून स्वच्छ, नीटनेटका कक्ष स्थापन करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दहा बाय दहाची रूम असल्याने कुणी नागरिक कक्षात आल्यास त्यास बसायलाही पुरेशी जागा नाही. रूमला खिडक्या नसल्याने हवा खेळती राहण्यासाठी जागा नाही.
अतिशय गुदमरलेल्या स्थितीत आपत्ती निवारण अधिकार्‍यास याठिकाणी काम करावे लागत आहे. यामुळे आपत्ती निवारण कक्ष जिल्ह्यावर आलेली आपत्ती कशी दूर करणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

व्यवस्थापन कक्ष नव्हे, अडगळीची खोली

सध्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये केरकचरा, घाण, जुने फर्निचर, खराब भिंती, अडगळीच्या वस्तू, भंगार सामान, आपत्ती निवारणासंदर्भातील विविध जुन्या वस्तू आदींचे साम्राज्य निर्माण झाल्याने कामकाजास जागा राहिलेली नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष नाही, तर अडगळीची खोली अशी कक्षाची स्थिती झाली आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago