नाशिक

सायबर गुन्ह्यात पोस्ट ऑफिसला 14 लाखांचा गंडा

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड हेड पोस्ट ऑफिस आणि जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथील एटीएम मशिनमधून अज्ञात सायबर गुन्हेगाराने एकूण 14 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गजेंद्र भालचंद्र भुसाणे (57, व्यवसाय – नोकरी, नाशिकरोड पोस्ट ऑफिस) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, नाशिकरोड हेड पोस्ट ऑफिस येथील एटीएम (क्रमांक 0620) मधून अज्ञात आरोपीने 20 वेगवेगळ्या बँकांच्या कार्डांचा वापर करून 124 बनावट व्यवहारांच्या माध्यमातून 10 लाख 20 हजार रुपये काढले. त्याचप्रमाणे, जीपीओ नाशिक येथील एटीएम (क्रमांक 0609) मधून 11 बँकांच्या कार्डाद्वारे 52 बनावट व्यवहार करत 3 लाख 91 हजार रुपये काढण्यात आले.असा एकूण 176 बनावट व्यवहार करत अज्ञात आरोपीने 14 लाख 11 हजार रुपयांची रक्कम फसवणूक करून उचलली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनि सुभाष ढवळे हे करीत आहेत.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago