नाशिक

नांदूरमध्यमेश्वरमधून 1,614 क्यूसेक विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी
नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात येणार्‍या विसर्गात सोमवारी (दि. 6) सायंकाळी 6 वाजता 807 क्यूसेकची वाढ करण्यात आली. त्यामुळे एकूण विसर्ग 1,614 क्यूसेक झाला आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास पुढील काळातही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
सोमवारी नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 807 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. सायंकाळी 6 वाजता त्यामध्ये आणखी 807 क्यूसेकची वाढ करण्यात आल्याने एकूण विसर्ग 1,614 क्यूसेक झाला आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रातील साहित्य व जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

Discharge of 1,614 cusecs from Nandur Madhmeshwar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago