नाशिक

नाशिक जिल्ह्यात आज ढगफुटीसदृश पाऊस

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : प्रतिनिधी
अरबी समुद्रावर बनत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या बर्‍याचशा भागात मंगळवारी, दि. 7 जुलै रोजी ढगफुटीसदृश पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बर्‍यापैकी त्र्यंबकेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुमारे 300 मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. कुठेही जीवितहानी होणार नाही, याबाबतही दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले
आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवण्याचे आदेश त्यांनी या आढावा बैठकीत दिले. अत्यावश्यक असल्याशिवाय नागरिकांनी आज घराबाहेर पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जाणे टाळावे!
नाशिकमधील हवामान अंदाज लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. बंद होऊ शकणारे रस्ते, दरडी कोसळण्याची ठिकाणी अशा सर्वंकष बाबींचा विचार करून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पर्यटकांनी जावू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. सर्व यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून संकटस्थिती उद्भवल्यास, अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. पुढील 48 तास ‘शून्य बळी’ हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Cloudburst-like rain in Nashik district today.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago