यंदा भाताला पाच हजारांपर्यंत भाव; घोटी बाजार समितीत शुक्रवारी बैठक
घोटी : प्रतिनिधी
चालू हंगामात इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक शेतकर्यांना ऐतिहासिक भाव मिळत असून, 80 किलोच्या पोत्याला 3,500 ते 4,000 रुपये (क्विंटलमागे 4,600 ते 5,000 रुपये) दर मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुष्काळाची दाहकता पाहता शेतकर्यांना अधिकाधिक दर मिळवून देण्यासाठी घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या 20 नोव्हेंबर रोजी शेतकरी-व्यापारी समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यात उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने केले आहे.
शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळणे आणि व्यापारी-शेतकरी यांच्यातील समन्वय साधणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे. वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेल्या भाताला उच्चांकी बाजारभाव मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असून, बैठकीत शेतकर्यांच्या अडचणींवर सकारात्मक चर्चा केली जाणार आहे.
घोटी व पेठ परिसरातील भाताची गुणवत्ता, मार्केटिंग आणि खरेदी-विक्रीतील गैरसमज दूर करण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागांच्या अधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
बाजारभाव मागणी व पुरवठ्यावर ठरत असले, तरी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यास नियमानुसार कारवाई करण्याची भूमिका बाजार समिती पार पाडेल.
तांदळातील भेसळीवर कडक नजर
तांदळामध्ये होत असलेल्या भेसळीच्या तक्रारींची बाजार समितीने गंभीर दखल घेतली असून, अन्न व औषध प्रशासनाला पत्र देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
District Collector’s ‘eccentric’ (Tughlaqi) order regarding Darna water rotation!
- सुजाता येवले फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना…
- अफजल पठाण कधीकाळी ज्यांच्याशिवाय दिवस सरत नव्हता, आज त्यांच्याशी बोलण्यासाठीही वेळ मागावा लागतो. एक…
पाणी हेच जीवन आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु, आज हेच जीवन संकटात…
बारामतीत 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र…
रोजच्या जगण्यातलं ‘कपडे वाळत घालणं’ हे दिसायला अत्यंत साधं वाटणारं काम, पण या एका साध्या…
घरं मोठी झाली, पण मनं छोटी कपडो की मॅचिंग बिठाने से सिर्फ शरीर सुंदर दिखेगा...…